श्रीमत्परमहंस पूर्णब्रम्‍ह भगवान परमानंद नारायण सरस्‍वती ब्रम्‍हदत्‍त यांनी सोsहं साधकांस उपदेशलेली चौदा उपदेश रत्‍ने

 • सर्वच वस्‍तुंचा नाश होतो सर्व नाशिवंतच आहे. फक्‍त आसमंतात वायु सदैव वसतो. यासाठी त्‍याला पुष्‍कळसे सांभाळा त्‍याचे वर नेहमी लक्ष ठेऊन त्‍याच्‍या सहवासात रहा.
 • अंत करण चतुष्‍टांची शय्या करुन चित्‍त चंद्राच्‍या शांत किरण प्रकाशात विश्राम करावा.
 • साधकाहो आपल्‍या प्रत्‍येक कृत्‍याचा साक्षी कोण आहे याचा सातत्‍याने विचार व आठवण ठेवा.
 • सतत अभ्‍यास करीत रहावे त्‍यातच अंहब्रम्‍हास्‍मी महावाक्‍याच्‍या(सोsहं) आशयात आनंदी राहण्‍याचा संकल्‍प करावा.
 • बाहय वैराग्‍य, अंर्तवैराग्‍य व ज्ञान वैराग्‍य असे वैराग्‍याचे तीन प्रकार आहेत. प्रपंच (संसार) करणा-यांना बाहय वैराग्‍याची गरज नसते. त्‍यांनी ज्ञान वैराग्‍याच्‍या साह्याने अंर्तवैराग्‍य राखावे.
 • एक क्षणभर देखील मी साधु आहे असे समजु नये. हा विचार मोठे पाप ठरते. मी तर खरोखरचा साधू होऊ इच्छितो व इतर सर्व लोक माझ्या पुढेच असतील असाच विचार मनात कायम ठेवणे.
 • मी अमुक केले, करतोय असे किंवा मला अमुक माहित आहे या क्रिया मी करतो असे कधीही कुणास सांगू नये.
 • दिव्‍य चक्षुंवर अधिक धारणा ठेवावी. त्‍यामुळे चित्‍त शुध्‍दी लवकर होते. परंपरा मुखोग्‍दत असावी व साधकाने त्‍याचा नेहमी सन्‍मान व स्‍वाभिमान बाळगावा.
 • चित्‍त शुध्‍दी साठी सतत प्रयत्‍न ठेवा, तथेच प्रणव (नाद) अनुभवास येतो त्‍यावरच मनुष्‍य मार्गक्रमण करु शकतो.
 • जी साधना आज करु शकता ती तात्‍काळ करा उदयाची गोष्‍ट कोण जाणतो.
 • सकाळ -संध्‍याकाळ निवांत स्‍थळी साधना करावी. झोपण्‍यापुर्वी व झोपेनंतरची वेळ साधने साठी सुयोग्‍य व लाभदायी आहे.
 • देहाभिमान जसा कमी होईल तशी वैराग्‍य बुध्‍दी बाढेल. सर्वावर समान दया उत्‍पन्‍न्‍ा होणे. हेच परमार्थाचे खरे लक्षण होय.
 • मनोकामना संकल्‍प-विकल्‍पाचे चूर्ण करून धर्म निश्‍चयाने साधना मार्गक्रमण करावे.
 • तुम्‍ही साधक भक्‍त मंडळी म्‍हणजे महात्‍मा सत्‍पुरुषांच्‍या अंगावरील रत्‍नजडीत आभूषण आहात संतजन तुम्‍हास जवळ घेतील, ते तुमची उपेक्षा करणार नाहीत.

   

ॐ नम हं शिव स गायत्री, आदिमाया, आदिशक्ति तुरयेअवस्‍थे ब्रम्‍हस्‍वरुपी       कुंडलनिस्थित सर्वशक्ति कामाक्षी भगवतेय नम: हरये नम: हरये नम: हरये नम:       ॐ श्रीमत्‍भगवान परमानंद नारायण सरस्‍वती ब्रम्‍हदत्‍त संजिवन चैतन्‍य       समाधिब्रम्‍ह चरणाय नम:       ॐ सोsहं, हंसाय, भगवान नारायण, सरस्‍वतेय नम:       ॐ हंसाय, परमांनद, स्‍वामी नारायण सरस्‍वती नम:       ॐ सोsहं, अलख निरंजन, सोहम हंसाय, ब्रम्‍हदत्‍ताय, परमानंदाय नम:       ॐ ब्रम्‍हदत्‍ताय, भिममुद्राय, बंधउड्डीयान, रुपपरमानंदाय नम:       ॐ सोsहं, जगतजननी, दत्‍तस्‍वरुपी, प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसरुपी, ज्ञानमुद्रा, महाकाय, सोहम् ध्‍वनी, प्रभु परमानंदाय नम:       ॐ आत्‍मरुपी नाग दर्शनाय, परमानंद महादेवाय नम:       ॐ अर्धनारीनटेश्‍वर, शिव, शक्तिस्‍वरुपी प्रभु परमानंदाय नम:       ॐ अनाहत सोहम् नाद, आत्‍मतेजाय, परमहंस परमानंदाय नम:       ॐ सोsहं आत्‍मानंदम, चैतन्‍यस्‍वरुपम्, भगवान परमानंदाय नम:       ॐ शक्तिमुद्राय, अखिल, अखिलांतक, ब्रम्‍हांडनायक नम:   &n      ॐ सोहंरुपी मुकुटधारी, अंतरंग जटाधारी सिध्‍दयोगी प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसाय वायुरुपी, महाकायरुपी, हनुमंत स्‍वरुपी प्रभु परमानंदाय नम:       ॐ सोsहं, व्‍याघ्रासनाधिष्‍टत्, श्रीमंतयोगी, जगतउध्‍दारी प्रभु परमानंदाय नम:       ॐ सोsहं, गजानन उध्‍दारी, आद्य गुरुस्‍थानी प्रभु परमानंदाय नम:       ॐ हंसाय, दासमधुसुदनाय, रचतजाय, लिन स्‍वरुपाय, अंतरंगशब्‍दे, योगेंद्र देहे       अंतरी जो वसत असे, परमदैवताय, परमानंद नारायण सरस्‍वती महादेवाय नम:       ॐ स्‍वयं सोहम् स्‍वरुपी, परमहंसयोगी, नाथपंथी, दत्‍तअवतारी, अंत्री निवासी,       शेषरुपी, महायोगी, प्रभुपरमानंदाय नम: