।। श्रीमत्भगवान परमानंद नारायण सरस्वती आरती ।।
नारायण सरस्वती परमानंद सद्गुरु मुर्ती
भक्तांच्या काजासाठी अवतरले जगजेठी
नारायण सरस्वती ।।
आरती सद्गुरुनाथा महाराजा ब्रम्हदत्ता
देवाऽदी देवराया, ब्रह्मदिक लागती पाया
निजभावे शरण येती, दर्शन होता सहज मुक्ती
नारायण सरस्वती परमानंद सद्रगुरु मुर्ती
भक्तांच्या काजासाठी अवतरले जगजेठी
नारायण सरस्वती।। १।।
चार सहा अठरा जण, तुमच्या पायी झाले लीन* (चार वेद, सहा
शास्त्र, अठरा पुराण)
मोक्ष सुख देवमुनी, लागे तातोबा चरणी
नारायण सरस्वती परमानंद सद्गुरु मुर्ती
भक्तांच्या काजासाठी अवतरले जगजेठी
नारायण सरस्वती ।।२।।