।।परम पुज्य सद्गुरुनाथ भोलानंद महाराजांची आरती ।।
आरती परमानंदाss, माझ्या
अंतरीच्या ब्रम्हा...अंतरीच्या ब्रह्मा आरती परमानंदा
ss
परमानंsद परमानsदss .. मनी दाटे आनंद... दाटे आनंद
आsरती देवदेवा... श्रीमत् परमहंस देव...परमहंस देवा आरती
परमानंदाss ||धृ||
काय देवा खंत वाटली, उर दाटूनी आलाss... दाटूनी आलाss...
दक्षिण काशी सोडोनिया, हा दास धावूनी आला...धावूनी आला
आरती परमानंदाss, माझ्या अंतरीच्या ब्रह्मा...अंतरीच्या
ब्रह्मा आरती परमानंदाss
परमानंsद परमानंsदss... मनी दाटे आनंद... दाटे आनंद
आरती देवदेवा... श्रीमत परमहंस देवा... परमहंस देवा आरती
परमानंदाss... ||१||
आत्मानंद पुर्णयोगेss, दास जीव उध्दरीला.. दास जीव उध्दरीला
आरती परमानंदाss, माझ्या अंतरीच्या ब्रह्मा...अंतरीच्या
ब्रह्मा आरती परमानंदाss
परमानंsद परमानंsदss... मनी दाटे आनंद... दाटे आनंद
आरती देवदेवा... श्रीमत परमहंस देवा... परमहंस देवा आरती
परमानंदाss... ||२||
गुरु माझा मधुसूदन, तुमचा दासाsनुदास, दासाsनुदास
तोच दावी तुझी वाट षट्चक्राचा घाट चक्रांचा घाट अवघड देवा
तुझी वाट
हंस सोsहं सोsहं हंसा: प्राण एकजीव झाला...एकजीव झाला...
मुलाधार सोडोनिया, हंस नभी उडाला... नभी उडाला...
आरती परमानंदाss, माझ्या अंतरीच्या ब्रह्मा...अंतरीच्या
ब्रह्मा आरती परमानंदाss
परमानंsद परमानंsदss... मनी दाटे आनंद... दाटे आनंद
आरती देवदेवा... श्रीमत परमहंस देवा... परमहंस देवा आरती
परमानंदाss... ||३||
सहस्त्रदली तुझा वास... तुझ्या भेटीची आस... भेटीssची आस...
अवघड देवा तुझी वाट, षट्चक्राचा घाट, चक्रांचा घाट... अवघड
देवा तुझी वाट
मायेच्या या अंधारात आम्हा दिसेना वाट...दिसेना वाssट...
प्राणहंसाची ही वात सोsहं ब्रह्मसुवर्ण ज्योत, भेद झाला
स्वस्वरुप
मुलाधार गजानंद, स्वाधिष्ठानी रामानंद
मनीपुरी यादवानंद हृदयस्थानी प्रेमानंद
कंठस्थानी पुर्णानंद आज्ञा झाले कृष्णानंद
कुंडलनी बाळानंद आत्मा झाला तात्यानंद
उजेड पडला प्रकाशनंद देह झाला विजयानंद
देव माझा परामानंद... भोगतो मी मोक्षानंद
आरती परमानंदाss, माझ्या अंतरीच्या ब्रह्मा...अंतरीच्या
ब्रह्मा आरती परमानंदाss
परमानंsद परमानंsदss... मनी दाटे आनंद... दाटे आनंद
आरती देवदेवा... श्रीमत परमहंस देवा... परमहंस देवा आरती
परमानंदाss... ||४||