।।पुज्य सदगुरु परमहंस मधुसुदन दादा महाराज आरती।।
जयदेव जयदेव जय मधुसुदना।
आरती ओवाळीता तव सुंदर गुरुवदना।। जयदेव जयदेवss ।।धृ।।
गंध अक्षता टिळा तव भव्य कपाळी, उन्मनी भाव घेई ठाव अंतरी
ध्यानस्थ समाधी होई अधांतरी,प्रकाश चौतन्याचा उधळी वायुवरी
जयदेव जयदेव जय श्री मधुसुदना।
आरती ओवाळीतो तव सुंदर गुरुवदना ।। जयदेव जयदेव ss।।१।।
गोपालदार गुरु प्रथम हटयोगी, हटयोगाच्या क्रिया झाल्या सहजशी
धौंती तू केली चिंती पितृ माऊली, वाहिले तूज त्यांनी गजाननाचे
पाऊली
जयदेव जयदेव जय मधुसुदना।
आरती ओवाळीता तव सुंदर गुरुवदना।। जयदेव जयदेवss ।।२।।
गजानने कृपा केली राजयोग दिधला, सोsहम अनुग्रहे मार्ग दाविला
अखंड अनुसंधाने सोsहम जपीला नारायण चरणी नमूनी बैसला
जयदेव जयदेव जय मधुसुदना।
आरती ओवाळीता तव सुंदर गुरुवदना।। जयदेव जयदेवss ।।३।।
मानसपुजा केली तू अखंड अहोरात्र, वेद मंत्रासी कधी ना भुललास
धांदात गुरुभक्ती निष्काम साधना, श्वासात सोsहम सदैव तो भरला
जयदेव जयदेव जय मधुसुदना।
आरती ओवाळीता तव सुंदर गुरुवदना।। जयदेव जयदेवss ।।४।।
तिर्थक्षेत्र नाशिक गोदावरी काठी, सदगुरु चरणी तू मारलीस मिठी
जयदेव जयदेव जय मधुसुदना।
आरती ओवाळीता तव सुंदर गुरुवदना।। जयदेव जयदेवss ।।५।।