परम सद्गुरु गजानंद परमानंद नारायण सरस्वरती
।।परम पुज्य् गजानंद महाराजांची आरती ।।
आरती परब्रह्म श्री गजानना देवा....२
निजभक्ताची निजभावाची घ्यावी हो सेवा हो देवा घ्यावी हो सेवा
आरती परब्रह्मा, श्री गजानना देवा ....२ ।।धृ।।
नवनाथामाजी चौरंगी, नाथ तुम्ही स्वामी हो देवा नाथ तुम्ही स्वामी
सांप्रदाय आदिनाथांची चालविला तुम्ही
आरती परब्रह्मा, श्री गजानना देवा ...२।।१।।
सोsहं नामे निज भक्तांशी पावन त्वा केले
स्वात्मा स्वरुपी नेऊनिया सदगुरु पद दिधले हो देवा सदगुरु पद दिधले
आरती परब्रह्मा श्री गजानना देवा ....२।।२।।
सगुण ब्रह्म तू सदगुरु देवा अवतारा घेशी, हो देवा अवतारा घेशी
प्रभुकूलतिका पतित पावना जडजीव उध्दरशी हो देवा जडजीव उध्दरशी
आरती परब्रह्मा श्री गजानना देवा...२।।३।।
अंत्रीक्षेत्री निजगुरु अपुले ब्रह्मिदुत असती हो देवा ब्रह्मिदुत असती
पुण्यस्थळी या सदगुरुपदी अखंड ही वसती हो देवा अखंड ही वसती
आरती परब्रह्मा श्री गजानना देवा....२।।४।।
कुलदैवत तू निजभ्क्तांचे जागृत हे अससी हो देवा जागृत हे अससी
निजकृपेने निजभक्तांचा योगक्षेम वाहशी हो देवा योगक्षेम वाहशी
आरती परब्रह्मा श्री गजानना देवा ....२।।५।।
नारायण तव सानलेकरु, हाका तुज मारी हो देवा हाका तुज मारी
सदगुरु माय पान्हा दे तव मायेने तारी हो देवा मायेने तारी
आरती परब्रह्मा श्री गजानना देवा....२।।६।।
निजभक्तांची निजभावाची घ्यावी हो सेवा हो देवा घ्यावी हो सेवा
आरती परब्रह्मा, श्री गजानना देवा ...३