।। देखिला मी देखिला ।।
देखिला मी देखिला परमानंद देखिला...२
चैतन्याचा पुतळाsssssssssssss२ ।।धृ।।
सुवर्णाच्या सिंहासनी, व्याघ्रासनी बैसोनी
गुडघ्यावरी कर ठेऊनी, ज्ञानमुद्रा दाऊनी
आसनस्थ जगतजननी, तुरिये दृष्टी पाहुनी
ठाव घेई ब्रह्मांडाsssssssssssss.....२
देखिला मी देखिला परमानंद देखिला...२
चैतन्याचा पुतळाsssssssssssss२ ।।१।।
हृदयमंदिरी दत्त पाहूनी, सोsहं नामे जप करुनी
नाथामाजी नाथ हाऊनी, दत्त दत्त दत्त म्हणोनी
ब्रह्मदत्त होऊनी, अंत्री क्षेत्री वास करोनी
गजाननासी उध्दारोनी, गजाननासी उध्दारोनी
पालन करी सकलाssssssssssssss.....२
देखिला मी देखिला परमानंद देखिला...२
चैतन्याचा पुतळाsssssssssssss२ ।।२।।
सोळा वर्षे पंजाब प्रांती, गुरुमुखी त्या अमृत वचनी
हनुमंताचे रुप वर्णुनी, हनुमंत रुपी स्वये होऊनी
चिरंजीवी माझा नाथ हाsssssssssssss....२
देखिला मी देखिला परमानंद देखिला...२
चैतन्याचा पुतळाsssssssssssss२ ।।३।।
परमानंद रुप पाहुनी, मधुसुदनदास वर्णूनी
रचत जाय लीन स्वरुपी, रचत जाय लीन स्वरुपी
सदगुरुचा महिमा हाssssssssssss.....२
देखिला मी देखिला परमानंद देखिला...२
चैतन्याचा पुतळाsssssssssssss२ ।।४।।