श्रीमत्परमहंस भगवान परमानंद नारायण सरस्वती
आत्मस्वरूप साधकहो,
सोsहं साधने विषयी व श्रीमत्परमहंस भगवान परमानंद नारायण सरस्वती संजिवन समाधी स्थानाविषयीच्या आणि अखंड पुज्यपाद परमहंस शिष्य परपरेंविषयी "सोsहं हंसोत्सव" या दिव्य संकेतस्थळास स्पर्श व रसपान करीत आहात. आपले ह्या आत्मसाक्षात्काराच्या दिव्य जिवन पथावर मार्गक्रमण होवो. हि अंत:करणपुर्वक सदिच्छा.
आम्हांस आपण नवखे जरी असलात तरी निर्गुणातील त्या जिवउध्दारक शक्तिला आपण परीचित आहात. आपण सर्व जिव त्या एकच परमांनद दिव्य शक्तिचे अंश आहोत. म्हणुनच आपण जन्मत: आनंदस्वरुप आहोत. भौतिक सुखाच्या इच्छेने जन्माचे कारण काय? हे आपण बहुदा विसरतोच. व त्यामुळे दु:खी पावतो मानवास आपल्या मुलत: आनंदी स्वरुपात लिन होण्याचा राजमार्ग म्हणजे अजपा सोsहं ची साधना होय.
श्रीमत्भगवान परमानंद दिव्य वचनात उपदेशित करतात - "सर्व नश्वर आहे, पण आसमंतात वायु सदैव वसतो, त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवा आणि त्याच्या सहवासात सतत रहा तोच एक शाश्वत आहे".
भगवान परमानंद हे कुठल्याही जाती-पंथ-धर्म-देश-काळ यांचे प्रतिनिधीत्व न करता, सर्वबंधने झुगारुन, केवळ मानवतेच्या उध्दारासाठीच साधना कार्य करण्याचे निर्देशित करतात. नैसर्गिक श्वास व उ:श्वास असणारा; कुठलेही काम करताना सहज करता येणारी सोsहं साधना म्हणजेच आत्मपूजा.
भगवान परमानंद पूज्यपादशिष्य परमसद्गुरुनाथ गजानंद महाराज म्हणतात "सद्गुरुंनी दिलेल्या सोsहं मंत्राचा निष्ठेने व विश्वासपुर्वक अभ्यास करुन साधकाची बाह्यपूजा, कर्मकांड, मंत्र, यज्ञयाग यांची इच्छा नष्ट होते. तो बाह्य पूजा न करता मानसपूजा व सोsहं साधना करुन परमानंद प्राप्ती करुन घेतो".
सोsहं साधना करुन मनुष्य प्राणी जिवनमुक्त होऊन परमानंद स्वरुपात विलीन होतो.